तळेगाव ढमढेरे : कामगारानेच चोरले 1 लाख 80 हजारांचे भंगार | पुढारी

तळेगाव ढमढेरे : कामगारानेच चोरले 1 लाख 80 हजारांचे भंगार

तळेगाव ढमढेरे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वाबळेवाडीतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानात कामाला असलेल्या कामगाराने दुकानातील 1 लाख 80 हजारांचे भंगार चोरले. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दर्जाराम लुबाराम चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कानाराम दीपारामजी चौधरी (वय 34, रा. शिक्रापूर, ता. शिरूर; मूळ रा. सणवाडा, ता.
रेवदर, जि. सिरोही, राजस्थान) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील वाबळेवाडी येथे कानाराम चौधरी यांचे भंगाराचे गोडाऊन आहे. खरेदी केलेले भंगार ते या गोडाऊनमध्ये ठेवत असतात. मंगळवारी (दि. 1) रात्रीच्या सुमारास कानाराम गोडाऊन बंद करून घरी गेले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पुन्हा गोडाऊनमध्ये आले असताना त्यांना गोडाऊनमधील काही माल कमी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पूर्ण पाहणी केली असता गोडाऊनमधील 6 हजार किलो वजनाचे 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे भंगार चोरीला गेल्याचे दिसून आले.

दरम्यान, त्यांनी कामगार दर्जाराम चौधरी याच्याशी चर्चा केली असता तो संशयास्पद व उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर दर्जाराम हा मोबाईल बंद करून निघून गेला. चौकशी केली असता कामगार दर्जारामने टेम्पो (एमएच 12 जेएफ 1207) मधून हे भंगार साहित्य चोरून नेल्याचे समोर आले. शिक्रापूर पोलिसांनी दर्जाराम लुबाराम चौधरी (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल दांडगे या घटनेचा तपास करीत आहेत.

हेही वाचा

नगर : तिघा गोरक्षकांवर जमावाचा हल्ला ; चांदणी चौकातील घटना

पुणे विमानतळावरील कार्गो टर्मिनलचे उद्घाटन

नगर पोलिस दलातील 49 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या !

Back to top button