पुणे विमानतळावरील कार्गो टर्मिनलचे उद्घाटन | पुढारी

पुणे विमानतळावरील कार्गो टर्मिनलचे उद्घाटन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बर्‍याच महिन्यांपासून तयार होऊन सज्ज असलेल्या नवीन कार्गो टर्मिनलचे शनिवारी (दि. 5) सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. या कार्गो टर्मिनलच्या उद्घाटनामुळे पुण्यातून होणारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक वाढणार आहे. परिणामी, पुण्यातील व्यापार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन कार्गो टर्मिनल बर्‍याच महिन्यांपासून खुले करण्यात आले नव्हते. यासंदर्भात दै. ‘पुढारी’कडून ‘नव्या कार्गो टर्मिनलला मुहूर्त कधी?’ असे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर विमानतळ प्रशासनाने दखल घेतली. शुक्रवारी ते सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली, आणि अखेर शनिवारी हे नवीन कार्गो टर्मिनल सुरू झाले. त्याचे उद्घाटन पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकारी व विमानतळ कर्मचारी उपस्थित होते. कार्गो टर्मिनल सुरू झाल्यामुळे पुण्यातून होणार्‍या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीत दुप्पट वाढ होणार आहे.

हवाई दलाची जमीन

हवाई दलाने पुणे विमानतळ प्रशासनाला हे कार्गो टर्मिनल उभारण्यासाठी मोठी मदत केली आहे. येथीलच 1.76 एकर जागा हवाई दलाने विमानतळ प्रशासनाला कार्गो टर्मिनलसाठी दिली. त्याच जागेवर आता हे कार्गो टर्मिनल उभारण्यात आले आहे.

हेही वाचा

कमरेला पिस्तूल, गुंडासोबत पोलिस उपनिरीक्षकाचा डान्स

Bharatiya Janata Yuva Morcha : भाजयुमो प्रदेश कार्यकारिणीत, नागपूरचा वरचष्मा !

नगर पोलिस दलातील 49 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या !

Back to top button