रत्नागिरी : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम | पुढारी

रत्नागिरी : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम

जालगाव, पुढारी वृत्तसेवा :  दापोली मधील राष्ट्रीयकृत बँकेत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असणाऱ्या नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. शिवाय, तिच्या डोक्याचे केस केमिकलयुक्त पाण्याने गेले का?  याचा तपास करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. तिच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. दापोली, खेड, चिपळूण आणि दोभोळ येथील पथक तपास कार्यात सक्रीय झाले आहेत.

खेड येथील पथकाला काही धागेदोरे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नीलिमा चव्हाण दापोली मधून निघाल्यानंतर खेड येथे पोहोचल्याचे पुरावे सापडले आहेत. खेडमधूनही ती चिपळूणकडे निघाल्याचे पुरावे आहेत. परंतु, चिपळूणला पोहोचल्याचे कोणतेही पुरावे सापडत नाहीत? त्यामुळे तपास यंत्रणा खेड मध्येच काहीतरी पुरावे सापडतील या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. नीलिमा हिच्या संपर्कात असणाऱ्या सर्व सहकारी कर्मचारी तसेच तिचे जालगाव मध्ये राहणारे, शेजारी आदींची तपासणी करण्यात आली आहे. परंतु, तपासातून काहीही निष्पन्न झाल्याचे पुढे येत नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button