Chandrayan 3 : ‘चांद्रयान-3’ चा चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश; आता वेध ‘दक्षिण ध्रुवा’चे | पुढारी

Chandrayan 3 : 'चांद्रयान-3' चा चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश; आता वेध 'दक्षिण ध्रुवा'चे

बंगळूर, पुढारी वृत्तसेवा : चांद्रयान-3 अवकाशयानाचा प्रवास नियोजितरीत्या होत आहे. आज (दि.५ ) सायंकाळी ७ वाजता चांद्रयानाने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे, अशी माहिती इस्रोने ट्विट करून दिली आहे. चांद्रयान 3 च्या चंद्राच्या कक्षेतील प्रवेशानंतर आता सर्वांचे वेध दक्षिण ध्रुवाकडे लागले आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी या यानाचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार असल्याची माहिती इस्रोतील सूत्रांनी दिली आहे. चांद्रयान 3 ला दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. यानाने यशस्वीरित्या लँडिंग केले तर ही मोहीम यशस्वी होईल. चंद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत पोहोचल्याचे ट्विट इस्रोने दिलेले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सूत्रांनी ही माहिती दिली. इस्रोने या यानाचे 14 जुलै रोजी यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले होते. त्यानंतर पृथ्वीभोवतीच्या पाच कक्षा पूर्ण केल्यानंतर १ ऑगस्टपासून या यानाचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. शुक्रवारपर्यंत या यानाने चंद्राच्या दिशेने दोन तृतीयांश इतके अंतर कापले होते. त्यानंतर आज शनिवारी चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. सॉफ्ट लँडिग पूर्वीचा हा एक सर्वात महत्त्‍वाचा टप्पा आज चांद्रयान 3 ने पूर्ण केला. चांद्रयान 3 ने आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार पाडले आहेत. त्यामुळे आता वेध दक्षिण ध्रुवावरील लँडिंगचे लागले आहेत.

चांद्रयानाची गती कमी करणार

चांद्रयान ३ ची गती आज ५ ऑगस्टपासून ते २३ ऑगस्टपर्यंत सातत्याने कमी करण्यात येईल. जेणेकरून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या हिशोबाने पाहिले तर चांद्रयान ३ ची गती खूप जास्त आहे. याला कमी करण्यासाठी १ किलोमीटर प्रति सेकंद इतकी गती कमी करावी लागेल. अर्थात ३६०० किलोमीटर प्रतितास या गतीने चांद्रयान चंद्राच्या ऑर्बिटला पकडेल. नंतर हळूहळू त्याला दक्षिणी ध्रुवावर उतरवण्यात येईल.

हेही वाचा :

Back to top button