Emergency Landing : इंडिगो विमान इंजिनमध्ये बिघाड; टेक ऑफनंतर अवघ्या १३ मिनिटात लँडिंग | पुढारी

Emergency Landing : इंडिगो विमान इंजिनमध्ये बिघाड; टेक ऑफनंतर अवघ्या १३ मिनिटात लँडिंग

पुढारी ऑनलाईन: पाटणा विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 2433 च्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. टेक ऑफनंतर अवघ्या १३ मिनिटात वैमानिकाने विमानाचे सुरक्षित लॅडिंग केले. ही घटना आज (दि.४ ऑगस्ट) सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी घडली. दरम्यान या विमानातील १८१ प्रवासी सुखरूप असून, विमानतळावर सर्व कामकाज सामान्य सुरू आहे, माहिती बिहारमधील पाटणा विमानतळ संचालकाने दिली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

१८१ प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाने (इंडिगो फ्लाइट 6E 2433) आपत्कालीन लँडिंग केले. पाटणाच्या जय प्रकाश नारायण विमानतळावरून विमानाने नुकतेच उड्डाण घेतले होते. तेव्हा वैमानिकाला तीन मिनिटांत इंजिनमध्ये बिघाडाचा सिग्नल मिळाला. प्रवाशांना सीट बेल्ट बांधण्याची सूचना करून केबिन क्रूने प्रवाशांना सुरक्षित राहण्याचे आश्वासन दिले आणि दुसरीकडे वैमानिकाने मागे फिरून 13 मिनिटांत विमान पाटणा विमानतळावर परत उतरवले. यामुळे १८१ प्रवाशांचा जीव वाचला आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

Back to top button