Organic Facial : ट्रेंड ऑर्गेनिक फेशियलचा; जाणून घ्या काय आहे वेगळेपण? | पुढारी

Organic Facial : ट्रेंड ऑर्गेनिक फेशियलचा; जाणून घ्या काय आहे वेगळेपण?

Organic Facial : तुमची त्वचा कशीही असेल तरी त्यावर उपयुक्त ठरेल असे, शिवाय रसायनमुक्त आणि जडीबुटी, फळे व भाज्यांच्या वापरातून साकारणारे ऑर्गेनिक फेशियल करून घेण्याचा ट्रेंड सध्या आला आहे. काय आहे या फेशियलचे वेगळेपण?

आपल्याकडच्या सौंदर्यंतज्ञ्ज्ञाच्या मते, चेहऱ्यावरचा नरमपणा कायम राखण्यासाठी फेशियल उपयोगी ठरते. फेशियलमुळे चेहन्यावरील डाग, व्रण, सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. त्यातही सध्या बरेच चर्चेत असलेले ऑर्गेनिक फेशियल है कोणत्याही ऋतूमध्ये प्रभावी ठरते, यामध्ये मसाजही अंतर्भूत असतो. असे सांगतात की, ऑर्गेनिक फेशियल करून घेतल्यावर तब्बल सहा महिन्यांपर्यंत त्वचेची वेगळी काळजी घेण्याची गरज भासत नाही आणि फेशियल करण्याचीही गरज पडत नाही! ऑर्गेनिक फेशियलमध्येही विविध प्रकार उपलब्ध आहेत. असे फेशियल नैसर्गिक असले, तरी फ्लॉवर फेशियलसारख्या एखाद्या थेरपीत त्वचेवर एखादे विशिष्ट फुलाचे फेशियल उपयुक्त ठरू शकत नाही.

Organic Facial : तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक

त्यामुळे योग्य व तज्ञ सल्ला घेतल्याशिवाय है। फेशियल करण्याच्या भानगडीत न पडलेलेच बरे. काही वेळा फ्लॉवर फेशियलच्या मिश्रणात रसायनांचाही वापर केला जातो. त्याबाबत दक्ष, सजग राहिलेलेच बरे. अन्यथा त्याचा दुष्परिणामच होण्याची शक्यता अधिक. हल्ली या अर्गेनिक फेशियलमध्ये फ्लॉवर फेशियलचा विशेषत्वाने विचार केला जाताना दिसतो.. असे फ्लोरल किंवा फ्लावर फेशियल करण्यापूर्वी त्वचेची चाचपणी करणे गरजेचे असते. त्वचा जास्त तेलकट असेल तर तेलकटपणा कमी करून त्वचेला तजेला देणारे फेशियल करून घ्यावे लागेल. त्वचेवर मुरूम, तारुण्यपीटिका, डाग असतील तर गुलाब, रजनीगंधा, कारनेशन, जरबेरा, लिलियम, सूर्यफुल, चायनीज हिबिस्कस, मेरीगोल्ड यापैकी एखाद्या प्रकारातील फेशियल करता येईल

हल्लीच्या काळात विविध रसायनांचा वापर शक्यतो टाळण्याकडे ज्यांचा कल आहे त्या व्यक्ती आता आवर्जून या फ्लोरल प्रकारच्या फेशियलकडे वळत आहेत. या फेशियलमध्ये यंत्राच्या साहाय्याने कुस्करलेली फुले वापरून त्यांचा लेप चेहऱ्यावर लावण्यात येतो. वेगवेगळ्या ब्युटी पार्लरमध्ये हे फ्लोरल फेशियल सुमारे १२० ते ५०० रुपयांदरम्यानच्या वेगवेगळ्या दरांमध्ये आता उपलब्ध झाले आहे. अशा फ्लोरल फेशियलने पाच ते सहा सिटिंग्जमध्ये चेहन्याला आगळा-वेगळा लूक येऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.

Organic Facial : गुलाब, रजनीगंधा, ऑर्केड आणखी बरीच फुले

नैसर्गिक आणि हर्बल असल्याने त्यांची मागणी मोठी आहे. रोझ, रजनीगंधा, कार्नेशन जाफरी, ऑर्केड, लिलियम, पॅराडाईज आदी फुलांचाही फेशियलमध्ये समावेश करण्याची सोय आहे. चेहऱ्यावर जर डाग असतील तर अशा चेहन्यासाठी रोझ फेशियलला प्राधान्य दिले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबांच्या फुलांपासून तयार करण्यात आलेले फेशियल करून घेतल्याने व गुलाबजल वापरल्याने ताजेतवाने वाटते असाही फीडबॅक यासंदर्भाने ऐकायला मिळत आहे.

ब्युटीपार्लर्समध्ये मेरीगोल्ड फेशियलचा उपयोग कोरड्या त्वचेसाठी केला जाताना दिसतो. कोरडेपणा कमी करून त्वचेला नैसर्गिक तजेला देण्याचे काम हे फेशियल करते. चेहन्यावरच्या मुरूम किंवा तारुण्यपीटिकांवरचा उपाय आणि त्याचबरोबर त्वचेला फ्रेश लुक मिळावा म्हणून लॅव्हेंडर फेशियल करून पाहण्याकडे कल जाणवतो आहे.

चेह-यावरच्या सुरकुत्या, जखमेचे डाग, कट यावरही है। फेशियल उपकारक मानले जात आहे. त्वचा जर मृतप्राय वाटत असेल आणि त्वचेचे पोषण करण्याची गरज भासत असेल तर सौंदर्यतज्ज्ञांच्या सल्ल्याने सूर्यफुलाच्या फेशियलचा वापर करता येऊ शकेल. एवढे सारे पर्याय सध्या फ्लोरल फेशियल दमाने उपलब्ध झाले आहेत. नवनवीन प्रयोगही चालू आहेत. अर्थात आपली त्वचा, आपली गरज आणि आपल्याला काय परवडू शकेल याचा विचार करून तज्ञांच्या सल्ल्यानेच प्रयोग केलेले बरे. कारण शेवटी प्रश्न आपल्या चेहऱ्याचा, आपल्या दिसण्याचा आहे!

हेही वाचा : 

Back to top button