पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास ६ कोटी २७ लाखांचे उत्पन्न | पुढारी

पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास ६ कोटी २७ लाखांचे उत्पन्न

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  आषाढी यात्रेत श्री विठ्ठलाकडे सुख- समृद्धीचे साकडे घालणार्‍या भक्तांनी विठुरायाच्या व रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले आहे. तसेच सोन्या -चांदीचे कोट्यवधी रुपयांचे दागिने अर्पण केले आहेत. मंदिर समितीला लाडू प्रसाद, परिवार देवता, सोने भेट, ऑनलाईन देणगी, भक्तनिवास आदींच्या माध्यमातून 6 कोटी 27 लाख 60 हजार 227 रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. जे गतवर्षीच्या माघी यात्रेच्या तुलनेत 57 लाख रुपयांनी जास्त आहे. दरम्यान, 2022 च्या आषाढी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला 5 कोटी 69 लाख 96 हजार 502 रुपये उत्पन्न मिळाले होते. मात्र यंदा उत्पन्नात 57 लाख 63 हजार 725 रुपयांची वाढ झालेली आहे, अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. या भाविकांनी श्रींच्या चरणी लाखो रुपयांचे दानही दिले आहे. श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या परिवार देवतांकडून जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळालेले आहे. त्याचबरोबर श्रींना सोने, चांदीची देखील भाविकांनी भेट दिलेली आहे. 19 जून ते 3 जुलै या दरम्यान आषाढी यात्रेत भाविकांनी दान दिले आहे. दरम्यान, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व कर्मचारी यांनी चांगली सुविधा दिल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

असे मिळाले उत्पन्न

सोने दागिने ः 13 लाख 32 हजार 475 रुपये
श्री विठ्ठलाच्या चरणी ः 45 लाख 23 हजार 210
रुक्मिणी मातेच्या चरणी ः 12 लाख 69 हजार 173
हुंडी पेटीतून 1 कोटी 38 लाख 8141
ऑनलाईन स्वरूपात 4 लाख 27 हजार 877
प्रसाद विक्री 72 लाख 42 हजार 280
परिवार देवता 53 लाख 44 हजार 117

Back to top button