कोल्हापूर: कुरुंदवाडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या उरूसाला प्रारंभ | पुढारी

कोल्हापूर: कुरुंदवाडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या उरूसाला प्रारंभ

कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड येथील ग्रामदैवत हजरत दौलतशहा वली यांच्या उरुसाला आज (दि.५) सुरूवात झाली. हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतीक असलेल्या समानतेची शिकवण देणा-या दौलतशहा दर्ग्याच्या उरूसाचे मानकरी गाव कामगार पोलीस पाटील रावसाहेब पाटील यांच्या हस्ते गलेफ व शाही संदल अर्पण करण्यात आली.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक व परंपरा असलेल्या हजरत दौलतशहा वली दर्ग्याच्या उरुसाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत शाही संदलने सुरूवात झाली. शाही संदलने सुरू झालेल्या उरूसाचा 5 दिवस आनंद लुटता येणार आहे.

राजवाडा ते दर्गा अशी मिरवणूक काढण्यात आली होती. बॅन्ड पथकने संदल मिरवणूक दर्ग्यात आल्यावर माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, अजित पाटील व दर्गाह विश्वस्तांच्या हस्ते पवित्र गलेफ व फुलांचा गलफ चढविण्यात आला. यावेळी खतम देण्यात आला. यावेळी दर्ग्यावर हातांचे पंजे मारण्यात आले.

उरूसा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, उरूस शांततेत पार पडावा, यासाठी सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आज सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तर महिला भाविकांनी श्रद्धेने दर्ग्यास दंडवत घातले.

यावेळी बापूसाहेब आसंगे, राजू आवळे, अख्तर मुल्ला, मज्जीद मुल्ला, राजू अत्तार, जितेंद्र साळुंखे, अकिल गोलंदाज, रमजान पाखाली, कुदरत भुसारी, तन्वीर मुल्ला, इम्तियाज मतवाल, मोहसीन, बापूसाहेब मुल्ला आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button