टीएमसी विद्यार्थी प्रतिनिधीची ‘ईडी’कडून 11 तास चौकशी | पुढारी

टीएमसी विद्यार्थी प्रतिनिधीची ‘ईडी’कडून 11 तास चौकशी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शालेय नोकरी घोटाळ्याप्रकरणी ईडीने तृणमूल विद्यार्थी परिषदेची जिल्हा अध्यक्ष सयोनी घोष हिची 11 तास चौकशी केली. घोष हिला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. ईडीने यावेळी सयोनी घोषला फ्लॅट खरेदी व्यवहार, आयटी रिटर्न, बँक खात्यांचा तपशील व गुंतवणुकीबद्दल विचारणा केली.

सयोनी घोष ही बंगाली अभिनेत्रीही असून ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर तिने आपण चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचे सांगितले.
नेमके कोणते प्रश्न विचारले होते, हे मी सांगू शकणार नाही; पण मी याबाबत काही कागदपत्रे हजर केली आहेत. ईडी अधिकार्‍यांचे समाधान झाले असेल, असे मला वाटते. त्यांनी मला पुन्हा बोलावले तर मी येथे पुन्हा येईन, असे सयोनी माध्यमांशी बोलताना म्हणाली. तृणमूल विद्यार्थी परिषद ही तृणमूल काँग्रेसची एक गटशाखा आहे.

Back to top button