Dharmendra first wife : धर्मेंद्र यांची पत्नी प्रकाश कौर यांचा हेमासोबतच्या नात्याविषयी मोठा खुलासा | पुढारी

Dharmendra first wife : धर्मेंद्र यांची पत्नी प्रकाश कौर यांचा हेमासोबतच्या नात्याविषयी मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : धर्मेंद्र यांनी आपली पहिली पत्नी प्रकाश कौरला घटस्फोट न देता अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले. (Dharmendra first wife) १९८० मध्ये धर्मेंद्र यांनी दुसरे लग्न केले होते. आता धर्मेंद्र यांच्या नातवाच्या लग्नात हेमा न दिसल्याने चर्चा झाली. सोशल मीडियावर प्रकाश कौर यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. (Dharmendra first wife)

घटस्फोट दिल्याविना धर्मेंद्र यांनी केला दुसरा विवाह

हेमा आणि धर्मेंद्र यांची पहिली भेट १९७० मध्ये तुम हसीं मैं जवां चित्रपटात काम करताना झाली. त्यांना एकमेकांशी प्रेम झालं. धर्मेंद्र विवाहित असून त्यांना ४ मुले होती. दोघांनी लग्न केलेय १९८२ मध्ये ईशा देओल आणि १९८५ मध्ये अहाना देओलचा जन्म झाला.

प्रकाश कौर यांनी पतीला दिला पाठिंबा

जेव्हा हेमा आणि धर्मेंद्र यांचे लग्न झाले तेव्हा अभिनेते धर्मेंद्र यांना वूमनायजरदेखी म्हटले गेले. एका मुलाखतीत प्रकाश कौरने आपल्या पतीचे समर्थन दिले. त्या म्हणाल्या, “केवळ माझे पतीच का, कोणत्याही पुरुषाला हेमा आवडणारतं. कुणी माझ्या पतीला वूमनायजर म्हणण्याची हिंमत कशी केली? इंडस्ट्रीत काही अभिनेत्यांचे अफेअर आहेत आणि काही जणांनी दुसरे लग्न केले.”

याशिवाय त्यांनी स्पष्ट केलं की, दुसऱ्या लग्नासाठी त्या हेमाला दोषी ठरवत नाहीत. परंतु, हेमाने जे केलं ते त्या कधीच करणार नाहीत. प्रकाश कौर म्हणाल्या की, “मी समजू शकते की, हेमा कोणत्या प्रसंगातून जात आहे. अगदी आपले नातेवाईक, मित्रांचा देखील तिला सामना करावा लागत आहे. पण, जर मी तिच्याजागी असते तर मी तिच्यासारखे कधीच वागले नसते. कारण एक महिला होण्याच्या नात्याने मी तिच्या भावना समजू शकते. पण एक पत्नी आणि एक आई म्हणून मी तिचा स्वीकार करत नाही.”

Back to top button