Joe Biden : जो बायडेन यांची जीभ घसरली; युक्रेन ऐवजी इराकचा उल्लेख आणि जगभर खिल्ली | पुढारी

Joe Biden : जो बायडेन यांची जीभ घसरली; युक्रेन ऐवजी इराकचा उल्लेख आणि जगभर खिल्ली

पुढारी ऑनलाईन डेस्क :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन  यांनी बुधवारी (दि.२८) पत्रकार परिषद घेतली. रशियावर निशाणा साधताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची जीभ घसरली.  या दरम्यान रशियावर निशाणा साधत ते म्हणाले की व्लादिमीर पुतिन इराकसोबतचे युद्ध हरत आहेत. ते घराघरात युद्ध हरत आहे, आपल्याच घरात युद्ध हरत आहे. जगभरात एकाकी पडले आहेत. इथे त्यांनी युक्रेन ऐवजी इराकचा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे जगभरातले विरोधक त्यांची खिल्ली उडवत आहेत.

माहितीनूसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी (दि.२८) पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान रशियावर निशाणा साधत ते म्हणाले की व्लादिमीर पुतिन इराकसोबत सुरु असलेले युद्ध हरत आहेत. त्याचबरोबर ते घराघरात युद्ध हरत आहे. यामुळे ते  जगभरात एकाकी पडत चालले आहेत. पुतिन नाटो, युरोपियन युनियन आणि जपानसह एकूण ४० देशांमध्ये कोणीही त्यांचा आदर करत नाही आहेत. याचबरोबर त्यांनी या पत्रकार परिषदेत मॉस्कोच्या प्रत्येक निर्णयाचा निषेध केला आहे. युक्रेन आणि तेथील जनतेला भक्कम पाठिंबा दर्शविला आहे.

युक्रेनमध्ये आणखी एक हल्ला, चार जणांचा मृत्यू 

माध्यमांच्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२६) पूर्व युक्रेनमधील क्रामतोर्स्कच्या गर्दीच्या भागात रशियन क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात एका मुलासह चार जणांचा मृत्यू झाला. याशिवाय अनेक जण जखमीही झाले आहेत. डोनेस्तकचे लष्करी अधिकारी पावलो किरिलेन्को यांनी सांगितले की, हा हल्ला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास झाला. हा परिसर खूप गजबजलेला आहे. येथे अनेक हॉटेल्स देखील आहेत. आता आम्ही मृत आणि जखमींची अचूक आकडेवारी मोजत आहोत.

हेही वाचा 

Back to top button