अहमदनगर : काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला; 600 गोण्यांसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

अहमदनगर : काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला; 600 गोण्यांसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : काळ्या बाजारात रेशनचा तांदूळ विकण्यासाठी घेऊन जात असलेला मालट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. रेशनिंगचा तब्बल सहाशे गोण्या तांदूळ व मालट्रक असा सहा लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर-जामखेड रस्त्यावरील कॅन्टोन्मेंटच्या बंद पडलेल्या टोलनाक्यावर सापळा लावून एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. कृष्णा गोविंद ढाकणे (वय 31) व विवेक रामभाऊ ढाकणे (वय 19, दोन्ही रा.धनगरवाडी, ता.आष्टी, जि.बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये रेशनिंगच्या तांदळाचा साठा आढळून आला. हा तांदूळ प्रकाश धनराज तोतला (फरार) व पवन प्रकाश तोतला (फरार) (दोघे रा.वंजारगल्ली, जि.बीड) यांच्या मालकीचा असल्याचे चालकाने सांगितले. बीड एमआयडीसीतील महेश गृहउद्योग येथील गोडाऊनमधून प्रत्येकी 50 किलो वजनाच्या 600 गोण्या तांदूळ मुंबई येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन तांदळासह मालट्रक जप्त केला. पोलिस हवालदार रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

अहमदनमगर जिल्ह्यात 20 हजार हेक्टरवर पेरणी; सर्वाधिक पेरा कपाशीचा

मी तू पण गेले वाया ! पाहता पंढरीच्या राया!!

क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण

Back to top button