परभणी : ‘पॉक्सो’ गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता | पुढारी

परभणी : 'पॉक्सो' गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता

जिंतूर (परभणी), पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करण्याच्या गुन्ह्यातील आरोपी गोपाल मधुकर जाधव याची परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीने दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यामध्ये तिने लिहिले होते की, गोपाल मधुकर जाधवने तिचा विनयभंग करून त्‍यावेळी काढलेले फोटो व्हाट्सॲपवर पाठवले. तसेच इंस्टाग्रामवर व्हायरल करून तिला धमकी दिली होती.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गोपाल मधुकर जाधव याच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायद्या, माहिती व तंत्रज्ञान कायद्या याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करून जिंतूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध परभणी येथील विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

तब्बल अडीच वर्षे चाललेल्या या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अनेक साक्षीदार तपासण्यात आले व आरोपीतर्फे त्यांची उलटतपासणी घेतली. त्यांनी या प्रकरणात एफ.आय.आर दाखल करण्यात झालेला उशीर झाला आणि पुरावे न्यायालयासमोर सादर करता आले नाहीत. सर्व साक्षी पुरावे तपासल्यानंतर आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

.हेही वाचा 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरतेवर आरबीआय गव्हर्नरचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

Haridwar Dubey Death : भाजपचे राज्यसभा खासदार हरिद्वार दुबे यांचे निधन 

वडगाव मावळ : 2024 ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील : रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचा दावा

Back to top button