पुणे: धनकवडी परिसरात हलक्या सरी | पुढारी

पुणे: धनकवडी परिसरात हलक्या सरी

धनकवडी (पुणे) : सातारा रस्ता, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसरात सकाळी आठपासूनच दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, पाऊस पडत नव्हता. अखेर पावसाला सुरिवात झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

परिसरात सकाळी आठच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारी पावसाने थोडी विश्रांती घेतली आणि त्यानंतर चारच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. काठी ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठून राहिल्याचे चित्र दिसून आले. विद्यार्थी, नोकरदार आणि पथारी व्यावसायिकांची या पावसामुळे तारांबळ उडाली.

हेही वाचा:

आनंद वार्ता: मान्सूनने राज्याचा बहुतांश भाग व्यापला, कोकण, विदर्भात अतिमुसळधार पाऊस बरसणार

कडूस : ऐन पावसाळ्यात महिलांच्या डोक्यावर हंडा; पावसाने दडी मारल्याचा गंभीर परिणाम

Ashadhi Wari 2023 : सराटी येथे तुकाराम महाराज पादुकांना नीरा स्नान; पुणे जिल्ह्यातून पालखीस निरोप

 

 

Back to top button