‘त्या’ घटनेने वरवंडकर निशब्द ; वारीला गेलेल्या आईला बातमी समजताच अश्रू अनावर | पुढारी

'त्या' घटनेने वरवंडकर निशब्द ; वारीला गेलेल्या आईला बातमी समजताच अश्रू अनावर

 दीपक देशमुख : 

यवत :  मंगळवारचा दिवस वरवंडकरांच्या जीवनात नेहमीप्रमाणे च होता गावात सगळे व्यवहार सुरळीत चालू होते. आणि सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास गावातील एका गृहप्रकल्प मध्ये पती पत्नी ने आत्महत्या केल्याची घटना सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि सगळे लोक त्या ठिकाणी जमा होऊ लागले. गावातील तरुण मुलगा आणि शून्यातून सर्व उभा करण्याची क्षमता आणि कर्तृत्व असलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टर अतुल दिवेकर ने आपल्या मुलांना आणि पत्नीला मारून स्वतः च जीवन संपवलं होतं हे कळताच उपस्थित सर्व निशब्द झाले. कोणाला काय बोलाव हेच सुचेना.

अतुल ने अस का केलं असावा याचा अंदाज जो तो आप-आपल्या परीने लावत होता. घटनास्थळी आलेल्या पोलिसांना अतुलच्या जवळ एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने आपण मुलांना विहिरीत टाकून दिलं असून पत्नी ला देखील मारून स्वतः आत्महत्या करत असल्याचे लिहिलं होतं. अतुलने अस नको होतं करायला अस प्रत्येकाला वाटतं पण आता ती घटना घडून गेली होती. अतुलसारखा मुलगा एवढा टोकाचा निर्णय कसा घेऊ शकतो ह्या प्रश्नचे उत्तर जरी आता कोणाकडे नसलं तरी अतुल ने आपलं जीवन मोठ्या संघर्षातून उभ केल होतं.

शेतकरी कुटूंबातील शिवाजी दिवेकर यांना अतुल आणि सागर ही दोन मुलं शिवाजी दिवेकर म्हणजे अतुल चे वडील प्रचंड व्यसनाच्या आधीन होते तरीही अतुल ने स्वतःच्या शिक्षण घेतानाच  सागरला कस उच्चशिक्षित करता येईल हे कायम पाहिलं. आईच्या मदतीने स्वतः आणि सागर दोघेही चांगले शिकले. अतुल ने पशुवैद्यकीय सेवा वरवंड आणि परिसरात सुरू केली कायम हसरा चेहरा मनसोक्त बोलणं आणि चोवीस तास सेवा देण्याची अतुल ची पद्धत अतुल ला व्यवसाय मध्ये उभारी देणारी ठरली. त्याचवेळी सागर ला देखील पुण्यात नामांकित कंपनी मध्ये नोकरी लागली हे सगळं करत असताना अतुल आणि सागर यांचा विवाह झाला दरम्यान च्या काळात अतुल चे वडील गेले स्वतः च्या कष्टवर मोठी झालेली मुलं म्हणून वरवंड परिसर अतुल आणि सागर कडे पाहू लागला.

एवढं सगळं घडत असताना एवढा मोठ्या संघर्ष तुन अतुल ने आपलं आयुष्य उभं केलं असताना त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला  असावा हे वरवंड परिसराला न उलगडणार कोडं ठरलं

आई वारीच्या वाटेवर

आपल्या मुलांचे संसार सुखाचे व्हावे म्हणून पांडुरंगला साकडं घालण्यासाठी अतुल दिवेकर याची आई पुष्पा दिवेकर ह्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारीला गेल्या होत्या परंतु या घटना त्यांना समजताच त्यांनी हंबरडा फोडला.

हे ही वाचा : 

पुणे हादरले : पत्नी, दोन मुलांना ठार मारून डॉक्टरने संपवले जीवन

पुणे : मांजरीची पाणीपुरवठा योजना पालिकेकडे

Back to top button