पुणे : मांजरीची पाणीपुरवठा योजना पालिकेकडे | पुढारी

पुणे : मांजरीची पाणीपुरवठा योजना पालिकेकडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मांजरी येथे हाती घेण्यात आलेली पाणीपुरवठा योजना महापालिकेकडे हस्तांतरित होणार आहे. त्यासाठी महापालिकेला दोन कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मांजरी येथे सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत या योजनेचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. मांजरी हे गाव 30 जून 2021 च्या नोटिफिकेशनप्रमाणे पुणे महापालिकेत समाविष्ट झाले आहे.

त्यामुळे ही योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, महापालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, कार्यकारी अभियंता पी. सी. भांडेकर, कार्यकारी अभियंता सुभाष पावरा यांनी मांजरी येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 (पुणे-सोलापूर हायवे) क्रॉसिंग व लगतसाठी 2 कोटी 62 लाख 7 हजार 935 इतक्या रकमेची मागणी संबंधित विभागाने केलेली आहे. तथापि, योजनेच्या मूळ मंजूर किमतीत तरतूद नसल्याने ही रक्कम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे भरणा करणे शक्य झाले नाही. यावर महापालिकेशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे खासदार डॉ. कोल्हे व आमदार तुपे यांनी सांगितले होते. त्यानुसार प्राधिकरण उर्वरित कामे पूर्ण करून ही योजना पुणे पालिकेकडे हस्तांतरित करणार आहे. \

हे ही वाचा : 

ठाणे व पालघर जिल्ह्यात झालेल्या धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी चौघांचे निलंबन

पुणे : सायबर पोलिस आयुक्तांचं नाव वापरुन अडकवले सेक्सटॉर्शनच्या विळख्यात

Back to top button