पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मारकाला राज्य सरकार देणार पाच कोटी | पुढारी

पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मारकाला राज्य सरकार देणार पाच कोटी

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कुशल हातांना रोजगार मिळावा, छोट्या-मोठ्या उद्योगांना चालना मिळावी तसेच, यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची स्फूर्ती भावी पिढीला मिळावी म्हणून यशवंतराव चव्हाण स्मारक समितीतर्फे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे अद्ययावत स्मारक उभारण्यात येत आहे. त्या स्मारकासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 5 कोटीचे अनुदान दिले आहे.

स्मारकासाठी रक्कम कमी पडत असल्याने राज्य सरकार आणखी 5 कोटींचे अनुदान देणार आहे, अशी घोषणा नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या स्मारकाच्या इमारती व परिसराचा आराखडा मंजूर करून चार मजल्यापर्यंतचे इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. संपूर्ण इमारत बांधण्याचा खर्च अंदाजे 15 कोटी आहे.

स्मारकासाठी महापालिकेने 5 कोटीचे अनुदान दिले आहे. स्मारकाचे काम पूर्ण होऊ न शकल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे स्मारकाला निधी देण्याची विनंती आमदार अश्विनी जगताप यांनी केली. त्यानुसार स्मारकाला पाच कोटीचे अनुदान देण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी थेरगाव येथील कार्यक्रमात तात्काळ जाहीर

स्मारकात काय असणार सुविधा?

निगडी, प्राधिकरण येथील 44 गुंठे जागेत हे स्मारक उभारण्यात येत आहे. स्मारकामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णकृती पुतळा तसेच, गोरगरीब मुलांसाठी वसतिगृह, विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र, वधू-वर सूचक केंद्र, नोकरीविषयक मार्गदर्शन केंद्र, सुसज्ज ग्रंथालय आदी सुविधा असणार आहेत.

हेही वाचा

अखेर कल्याण-नगर महामार्गावर गतिरोधक पट्ट्या अवतरल्या

पिंपरी : निगडीतील जागा शिवजयंतीसाठी ठेवा; मुखमंत्र्यांचे पीएमआरडीएला आदेश

कोपरगावच्या एमपीएससी उत्तीर्ण तरुणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यू

Back to top button