शरद पवार हे ज्येष्ठ नाही तर फक्त वयोवृध्द नेते :  गुणरत्न सदावर्ते | पुढारी

शरद पवार हे ज्येष्ठ नाही तर फक्त वयोवृध्द नेते :  गुणरत्न सदावर्ते

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कर्मचाऱ्यांच्या सहकारी बँकेतून शरद पवार पवार यांच्या सहकाऱ्यांना कष्टकऱ्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे शरद पवारांचा हा पराभव आहे. शरद पवार ज्येष्ठ नाही तर वयोवृद्ध नेते आहेत, अशी टीका अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी केली. ते एसटी कामगारांच्या निवडणुकीच्या निमित्ताने नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी हे भाष्य केले.

सदावर्ते म्हणाले, मविआ सरकारने सिल्वरओक मध्ये आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना गुन्ह्यात अडकवले होते. मात्र, फडणवीस यांनी त्यांना पुन्हा नोकरी दिली आहे. एसटी कामगारांच्या शासनातील विलनीकरणाची लढाई आम्ही पुढेही लढत राहू असेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी चालक, मेकॅनिकला अध्यक्ष केले नाही. आम्ही ते करून दाखवू असे बजावत त्यांच्या खा सुप्रिया सुळे यांच्या विचार, धोरणांचा निषेध केला.

आम्हाला एसटी कर्मचारी सहकारी बँकेच्या निवडणुकीची फार चिंता नाही. मात्र स्वतंत्र विदर्भासाठी एसटी कामगार सहकारी बँकेचे मुख्यालय नागपुरात व्हावे असे आमचे प्रयत्न आहेत. आम्ही स्वतंत्र विदर्भवादी आहोत. लहान राज्यांची संकल्पना आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. हाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता, असेही सदावर्ते यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का?

Back to top button