पालकमंत्र्यांकडून समंजसपणाची अपेक्षा : साताऱ्यात दोन नेत्यांच्या ‘इगो वॉर’वर आमदार शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया | पुढारी

पालकमंत्र्यांकडून समंजसपणाची अपेक्षा : साताऱ्यात दोन नेत्यांच्या 'इगो वॉर'वर आमदार शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया

सातारा; पुढारी वृत्तसेवा : एकाने भिंतीवर चित्र रंगवलं म्हणून दुसऱ्याने स्मारकाचा विषय काढला आहे. दुर्दैवाने या दोन्ही नेत्यांमध्ये सातारकर आणि शिवभक्त गुरफटले गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा सातारचे छत्रपती शाहू महाराज यांच्या बाबत कोणतीही तडजोड कोणीही करणार नाही. त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेला ‘इगो वॉर’ थांबवावा अशी कानउघाडणी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

साताऱ्यात सध्या सुरू असलेल्या स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या आयलॅन्ड आणि शिवतीर्थ या विषयावर आ. शिवेंद्रराजे भोसले माध्यमांशी बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दोन्ही नेत्यांची कान उघडणी केली आहे. तसेच थेट उदयनराजे भोसले यांच्यावरही टीकास्त्र सोडले

उदयनराजें स्वतः च्याच विश्वात : आ. शिवेंद्रराजे भोसले

माझं स्पष्ट मत आहे, दोन्ही नेत्यांच्यात इगो वाॅर सुरू आहे. पालकमंत्र्यांनीच याबाबतीत सामंजसपणा दाखवावा. कारण उदयनराजेंशी बोलण्यात काही अर्थच नाही, उदयनराजे हे स्वतःच्याच विश्वात सतत असल्यामुळे त्यांच्याकडून भूमिका घेतली जाईल अस वाटत नाही. मंत्र्यांनीच सामंजसपणा दाखवून शिवभक्तांचा भावनेचा विचार करून हे स्मारक पोवई नाका येथे न करता दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी करावे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याबद्दल आम्हांला आदर आहे, आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

Back to top button