Jharkhand | झारखंडमध्ये खाण कोसळून तिघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भिती | पुढारी

Jharkhand | झारखंडमध्ये खाण कोसळून तिघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भिती

पुढारी ऑनलाईन : झारखंडमधील धनबादमध्ये बेकायदेशीर कोळसा खाण कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. या खाणीत अनेकजण अडकल्याची भीती आहे, असे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. घटनास्थळी सीआयएसएफ जवानांकडून बचावकार्य सुरु आहे. भौरा ओपी परिसरातील एटी देव प्रभा आउटसोर्सिंगमध्ये अवैध उत्खनन सुरू असताना ही घटना घडली. या परिसरात बेकायदेशीरपणे कोळसा उत्खनन सुरू असल्याचे सांगण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच विविध पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुसरीकडे मदत आणि बचावकार्यात विलंब झाल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना कोळसा चोरीदरम्यान घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, खाणीतून कोळसा काढण्याचे काम सुरु असतानी ती कोसळली. यात कोळखा उत्खनन करणारे १२ हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. यातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी संबंधित लोकांनी आक्रोश करत भरपाईची मागणी केली.

बीसीसीएल (भारत कोकिंग कोल लिमिटेड) या खुल्या खाणीचा काही भाग कोसळला. एकाचा मृतदेह सापडला आहे. या दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे याची पडताळणी केली जात आहे. आम्ही बीसीसीएलच्या अहवालाची वाट पाहत आहोत. या अहवालानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती धनबादचे एसएसपी संजीव कुमार यांनी दिली.

हे ही वाचा :

Back to top button