Jharkhand : झारखंडमध्ये माओवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू | पुढारी

Jharkhand : झारखंडमध्ये माओवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडच्या Jharkhand पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात सीपीआय माओवाद्यांनी पेरलेल्या आयईडीचा स्फोट होऊन एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रेंगराहाटूच्या बांगलासाई टोला येथील रहिवासी असलेला हा मुलगा केंदूची पाने तोडण्यासाठी रोलाबरूपी जेंगागडा जंगलात गेला होता. दरम्यान, माओवाद्यांनी 17 मे रोजी संध्याकाळी सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी आयईडी स्फोटके पेरून ठेवली होती. या स्फोटकांचा स्फोट झाला, अशी माहिती पोलीस अधीक्षक आशुतोष यांनी दिली.

जिल्हा पोलिस आणि सीआरपीएफसह सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून चाईबासा येथील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला Jharkhand आहे.

दरम्यान, सीआरपीएफ, कोब्रा आणि झारखंड जॅग्वारसह जिल्हा पोलिसांनी या वर्षी जानेवारीपासून बंदी घातलेल्या संघटनेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू केले होते. त्यामुळे सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी माओवाद्यांनी आयईडीएस पेरले होते. जानेवारीपासून जिल्ह्यात माओवाद्यांनी लावलेल्या आयईडी स्फोटात दोन वृद्ध महिलांसह पाच ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा 

Back to top button