आणि तृप्ती देसाई म्हणाल्या, 'सांभाळून बोलायचं' | पुढारी

आणि तृप्ती देसाई म्हणाल्या, 'सांभाळून बोलायचं'

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये (बिग बॉस मराठी सिझन तिसरा) आज विकास आणि तृप्ती देसाई एका महत्वाच्या मुद्द्यावर संभाषण करताना दिसणार आहेत. बिग बॉस मराठीच्या (बिग बॉस मराठी सिझन तिसरा) घरामध्ये आता दोन गृप झालेले स्पष्टपणे दिसून येते आहे.

उत्कर्ष, मीरा, गायत्री, जय, स्नेहा, दादूस आणि तृप्ती देसाई. तर दुसरीकडे विकास, विशाल, आविष्कार, मीनल, सोनाली आणि आदिश. पण या सगळ्यात कुठेतरी स्नेहा, तृप्तीताई आणि दादूस यांचं बॉंडिंग कमी झालेले अजिबात दिसून येत नाही. आज तृप्ती आणि विकास पाटील सदस्याचे मत किती महत्वाचे असणार आहेत यावरून चर्चा करताना दिसणार आहेत.

तृप्ती म्हणाल्या… मग लागेल आता नंबर लवकरच. बघूया, जमलं तर आम्ही लवकरच बघू. कारण एका मतानेच कधीही फरक पडणार.. कितीही कमी झाले तरी. बरोबर ना ?आता घरात १३ जण आहेत, मग १२ होतील. म्हणजे दोन्ही मध्ये ६- ६… आता यामध्ये एक मत कुठे जाणार यावरच असणार ना ? एका मतावर गेम असतो.

विकास म्हणाला, आणि ते तुमचं असणार आहे… बघूया… विचार करा… तृप्तीताई म्हणाल्या, “सांभाळून बोलायचं म्हणून…” विकास म्हणाला, मग हातामिळवणी… तृप्तीताई म्हणाल्या नको नको…

बघूया काय होतं पुढे घरामध्ये. तेव्हा जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज आरतरी ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

अधिक वाचा-

Back to top button