J&K | राजौरीतील जंगलात चकमक, एक दहशतवादी ठार | पुढारी

J&K | राजौरीतील जंगलात चकमक, एक दहशतवादी ठार

पुढारी ऑनलाईन : जम्मू- काश्मीरमधील राजौरीतील दसल जंगल परिसरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. या ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. राजौरीतील दसल मेहरी भागात चकमक झाली असल्याचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.

एका विशिष्ट माहितीच्या आधारे, सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील जंगल भागात प्रमाणात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. या दरम्यान सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा ठावठिकाणी शोधण्यात यश आले आणि मध्यरात्रीनंतर चकमक सुरू झाली.

“जम्मू- काश्मीर पोलिसांच्या समन्वयाने भारतीय सैन्याने सुरु केलेल्या शोधमोहिमेदरम्यान मध्यरात्री दसल गुजरन (राजौरीजवळ) जंगल परिसरात दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाल दिसून आल्या. पण या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. रात्रभर चकमक सुरू होती,” असे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.

गुरुवारी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती आणि त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता, असे पोलिसांनी सांगितले.

 हे ही वाचा :

Back to top button