ओडिशातील जंगलात चकमक, तीन नक्षलींचा खात्‍मा | पुढारी

ओडिशातील जंगलात चकमक, तीन नक्षलींचा खात्‍मा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ओडिशा राज्‍यातील कालाहांडी जिल्ह्यातील जंगलात आज ( दि.९) पाेलिसांबराेबर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. या कारवाईत एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे, अशी माहिती वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

कालाहंडी-कंधमाल जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगल परिसरात आज सकाळी पोलिसांनी शोध मोहिम राबवली. या वेळी नक्षलींनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी चोख प्रत्‍युत्तर दिले. यामध्‍ये तीन नक्षलवादी ठार झाले असून, पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी जखमी झाला आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील बन्सल यांनी दिली. जखमींना तात्काळ बोलंगीर येथील भीमा भोई रुग्णालयात दाखल करण्यात आले, असेही त्‍यांनी सांगितले. कालाहंडी-कंधमाल जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगल भागात अजूनही शोध मोहिम सुरु असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button