चंद्रपूर : वरोरा शहरातून निघाली खासदार धानोरकर यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा | पुढारी

चंद्रपूर : वरोरा शहरातून निघाली खासदार धानोरकर यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची अंत्ययात्रा वरोरा शहरातून काढण्यात आली. यावेळी हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्‍यांच्या अंत्‍ययात्रेला उपस्‍थिती लावली.

चंद्रपूरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे (30 मे) रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले. काल (मंगळवार) त्यांचे पार्थिव त्यांच्या वरोरा निवास्थानी आणून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आज (बुधवार) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा त्यांच्या निवस्थनावरून काढण्यात आली.

शहरातील मुख्य मार्गाने ही अंत्ययात्रा वरोरा वणी बायपास मार्गावरील मोक्षधामकडे निघाली. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्ययात्रेमध्ये हजारो कार्यकर्ते, त्‍यांचे चाहते आणि नागरिकांची उपस्थिती आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button