चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे उपचारादरम्यान निधन | पुढारी

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे उपचारादरम्यान निधन

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर  यांचे आज (मंगळवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांना पोटाचा आजार होता. यासाठी ते नियमित उपचार करीत होते. प्रकृतीत  बिघाड झाल्याने  शनिवारी (२९ मे) रोजी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते. आज दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक घडामोडी घडत असतानाच कौटुंबिक दुःखद घटना घडली. त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाल्याने अस्वस्थ झाले होते. पोटाच्या आजाराने त्यांची प्रकृती बिघडली होती. नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुका, काँग्रेस मधील गटातटाचे राजकारण यामुळे वातावरण ढवळून निघाले होते. तसेच पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे यांना चौकशीसाठी ईडीची नोटीस आलेली होती.

हेही वाचा : 

Back to top button