तिन्ही सैन्य दलांत आता मनुष्यबळाची अदलाबदल! : भारतीय सैन्याचे क्रॉस स्‍टाफिंग, लष्‍कराच्या ४० अधिकाऱ्यांची तुकडी लवकरच हवाई तसेच नौदलात | पुढारी

तिन्ही सैन्य दलांत आता मनुष्यबळाची अदलाबदल! : भारतीय सैन्याचे क्रॉस स्‍टाफिंग, लष्‍कराच्या ४० अधिकाऱ्यांची तुकडी लवकरच हवाई तसेच नौदलात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय सैन्याच्या लष्कर, नौदल आणि हवाई या तिन्ही दलांतून आता मनुष्यबळाची अदलाबदल केली जाणार आहे. तिन्ही सैन्य दलांच्या कामकाजाचा अनुभव असावा व प्रसंगी कुठल्याही आघाडीवर काम करता यावे म्हणून हा प्रयोग राबविला जात आहे.

चाळीस लष्करी अधिकार्‍यांची एक मोठी तुकडी लवकरच भारतीय हवाईदल आणि नौदलात तैनात केली जाणार आहे. भारतीय सैन्यात एकात्मिकता यावी, हाही अर्थातच या प्रयोगाचा उद्देश आहे. क्रॉस स्टाफिंग वा क्रॉस पोस्टिंग अशी ही अभिनव योजना सैन्यात आता सुरू झाली आहे.

प्राथमिक पातळीवर मेजर आणि लेफ्टनंट कर्नलच्या पदांवरील अधिकार्‍यांची क्रॉस पोस्टिंग होईल. लवकरच हवाईदल आणि नौदलातील अधिकार्‍यांचीही लष्करी विभागात नियुक्ती शक्य आहे.

योजना का? हेतू काय?

* यूव्हीए, शस्त्रे, रडार, वाहने, दूरसंचार उपकरणांचा वापर याबाबतीत तिन्ही सैन्य दलांमध्ये किरकोळ फरक वगळता साम्यच आहे.
* क्षेपणास्त्र विभागातील यूव्हीए, लॉजिस्टिक, दुरुस्ती, रिकव्हरी तसेच पुरवठा व्यवस्थापनात सुलभता यावी, हादेखील एक हेतू आहे.
* क्रॉस पोस्टिंगमध्ये नवनियुक्त अधिकार्‍यांना प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीलाच तिन्ही सैन्य दलांतील कार्यपद्धती आणि बारकावे त्यांना आत्मसात करता येतील.

Back to top button