अफगाण-इराणमध्ये पाण्यावरून चकमक | पुढारी

अफगाण-इराणमध्ये पाण्यावरून चकमक

तेहरान/काबूल; वृत्तसंस्था : अफगाणिस्तान-इराणच्या सैन्यात रविवारी पाण्यावरून सीमेवर हिंसक धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. एका तालिबान्यासह इराणचे तीन सैनिक मारले गेले. दोन्ही देशांत हेलमंड नदीच्या पाण्यावरून वाद सुरू आहे.

इराणने गोळीबारासाठी तालिबानला जबाबदार धरले आहे. इराणने आधी गोळीबार सुरू केल्याचा दावा तालिबानने केला. तालिबान नेत्यांनी परवानगी दिली तर आम्ही अवघ्या 24 तासांत इराणला जिंकून दाखवू, अशी प्रतिक्रिया तालिबानचा कमांडर हमीद खोरासानी याने दिली आहे. अफगाणिस्तानात तालिबान झाल्यापासून इराणसोबत सीमेवर होणार्‍या चकमकींमध्ये वाढ झाली आहे. दोंन्ही सैन्यात नेहमी गोळीबाराच्या घटना घडतात.

Back to top button