नांदेड : शिरड येथे वीज पडून पाच शेळ्या दगावल्या; पशु पालकाचे ७५ हजार रुपयाचे नुकसान | पुढारी

नांदेड : शिरड येथे वीज पडून पाच शेळ्या दगावल्या; पशु पालकाचे ७५ हजार रुपयाचे नुकसान

हदगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शिरड येथे विज पडल्याने पाच शेळ्या दगावल्याची घटना रविवारी (दि. २८) सांयकाळी ४:३० वाजेच्या दरम्यान मनूला रोडवरील सरकारी विहिरीजवळ घडली.

शिरड येथील विजय चौरे हे नेहमी प्रमाणे १२ बारा शेळ्या घेऊन चारायला गेले होते. आचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने ते शेळ्या घेऊन घराकडे निघाले. यापैकी काही शेळ्यांच्या अंगावर विज कोसळली. या घटनेत मागे राहीलेल्या पाच शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत पशु पालकाचे ७५ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

Back to top button