ananya pandey : आता अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा ! चौकशीला हजर राहण्याचे आदेश | पुढारी

ananya pandey : आता अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा ! चौकशीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई; पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची आर्यन खानशी (ananya pandey) संबंधित क्रूझ शिप ड्रग्स प्रकरणात सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर ती एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. अनन्या आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कार्यालयात चौकशीसाठी पोहोचली होती. यावेळी तिचे वडील चंकी पांडे सोबत होते.

गुरुवारी एनसीबीची एक टीम अनन्याच्या (ananya pandey) घरी पोहोचली. या प्रकरणी चौकशीसाठी टीमने अनन्याला बोलावले होते, त्यानंतर ती सायंकाळी एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचली. एनसीबीने अनन्याचा लॅपटॉप आणि फोन जप्त केला आहे. आर्यन प्रकरणात व्हॉट्सअॅप चॅटमध्ये तिचे नाव आले होते.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात या महिन्याच्या सुरुवातीपासून तुरुंगात आहे. बुधवारी त्याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता, ज्यात त्याने व्हॉट्सअॅप चॅटचा संदर्भ दिला होता. यामध्ये अन्यनाचे (ananya pandey) नावही समोर आले होते.

आर्यनचा जेलमधील मुक्का वाढला

सत्र न्यायालयाने म्हटले होते की आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रथमदर्शनी दर्शवितो की तो नियमितपणे मादक पदार्थांच्या अवैध कार्यात गुंतलेला होता. दुसरीकडे, आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये भेटायला आला होता. दोघे १५ ते २० मिनिटे बोलले. दोघांमध्ये काचेची भिंत होती. संभाषणानंतर शाहरुख खान तुरुंगातून बाहेर पडला. आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत ३० तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर पुढील मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

२ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकल्यानंतर एनसीबीने प्रथम आर्यन आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच, या प्रकरणात एक नवीन माहिती देखील समोर आली.

असे सांगितले जात आहे की एनसीबीने आर्यनच्या ड्रगशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅट कोर्टाच्या ताब्यात दिले आहे, ज्यात एका नवीन अभिनेत्रीसोबत ड्रग्सबद्दल संभाषण आहे, तथापि, ही अभिनेत्री कोण आहे, यावर कोणताही खुलासा झाला नाही. आता केवळ उच्च न्यायालयात या प्रकरणावर नव्याने सुनावणी होणार नाही, तर सत्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत पाहता, त्या मुद्यांचाही विचार करावा लागेल, ज्यामुळे न्यायालयात जामीन मंजूर झाला नाही.

अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटात पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये छाप पाडली. आतापर्यंत अनन्या पांडेने ‘पती पत्नी और वो’ आणि ‘खली-पीली’ सारखे चित्रपट केले आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button