Virendra Sehwag : वीरेंद्र सेहवाग झाला आकाश मधवालचा फॅन | पुढारी

Virendra Sehwag : वीरेंद्र सेहवाग झाला आकाश मधवालचा फॅन

मुंबई; वृत्तसंस्था : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा (एमआय) वेगवान गोलंदाज आकाश मधवालच्या गोलंदाजीची पुनरावृत्ती करणे कोणालाही शक्य होणार नाही, असा विश्वास भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केला आहे. मधवालने आयपीएल 2023 च्या एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंटस्विरुद्ध 3.3 षटकांत 5 गडी बाद केले होते. त्यामुळे मुंबईने लखनऊचा 81 धावांनी पराभव केला. (Virendra Sehwag)

क्रिकबझशी संवाद साधताना, सेहवागने मधवालचे कौतुक केले आणि म्हटले की, आयपीएलमध्ये मधवालच्या आकडेवारीची पुनरावृत्ती करणे कोणालाही शक्य होणार नाही. सेहवाग म्हणाला, मला देता आले असते, तर मी मधवालला 10 पैकी 11 गुण दिले असते. ज्या पद्धतीने त्याने बदोनीला बाद केले, ते अतिशय शानदार होते. मधवालने अवघ्या पाच धावांत पाच बळी घेत अशी आकडेवारी नोंदवली आहे, ज्याची पुनरावृत्ती इतर कोणी करू शकणार नाही, असे मला वाटते. (Virendra Sehwag)

मधवालने आयपीएल 2023 मध्ये सात सामन्यांत 13 विकेट घेतल्या आहेत. सेहवाग म्हणाला, मधवालच्या वेगवान गतीमुळे बडोनीची विकेट मिळाली. कारण बॅकवर्ड लेन्थ बॉल मारण्याचा विचार करत असताना मधवालच्या गतीने मात दिली. मधवाल विचार करणारा गोलंदाज आहे आणि त्याला आयपीएलमध्ये निश्चितच भविष्य आहे.

हेही वाचा;

Back to top button