Nashik : घोटी बाजार समिती सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ | पुढारी

Nashik : घोटी बाजार समिती सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवून शेतकरी विकास पॅनलने आपले वर्चस्व स्थापित केले. त्यानंतर आज सभापती आणि उपसभापतींची निवड करण्यात आली. सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास यांनी कामकाज पाहिले. बाजार समितीचे सचिव जितेंद्र सांगळे यांनी त्यांना सहाय्य केले.

घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी एकमेव ज्ञानेश्वर लहाने यांचे नामनिर्देशन पत्र तर उपसभापती पदासाठी एकमेव शिवाजी शिरसाठ यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. नामनिर्देशन पत्र छाननी व माघार झाल्यावर एकमेव उमेदवार असल्याने सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने व उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.

बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १८ पैकी १६ शेतकरी विकास पॅनलला तर २ जागा शेतकरी परिवर्तन पॅनलला मिळाल्या होत्या. शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी आमदार शिवराम झोले, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर लहाने आदींनी केले होते. निवडीप्रसंगी शेतकरी विकास पॅनलचे संचालक निवृत्ती जाधव, सुनील जाधव, हरिदास लोहकरे, अर्जुन पोरजे, रमेश जाधव, भाऊसाहेब कडभाने, सुनीता संदीप गुळवे, आशा खातळे, राजाराम धोंगडे, अर्जुन भोर, संपत वाजे, भरत आरोटे, नंदलाल पिचा, रमेश जाधव, शेतकरी परिवर्तन पॅनलचे संचालक दिलीप चौधरी, ॲड. मारुती आघाण उपस्थित होते.

यावेळी लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा केला. या प्रसंगी भगवान आडोळे, नंदलाल भागडे, दिलीप जाधव, प्रशांत कडु, शिवराम धोंगडे, गुलाब वाजे, मोहन ब-हे, विठ्ठल लंगडे, अनिल भोपे, रामदास गव्हाणे, भगीरथ मराडे, हनुमान मराडे, दशरथ आडोळे, बाळा गव्हाणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button