प्रेमाच्या नात्यात गुंफलेली बहिणींची गोष्ट – “काव्यांजली-सखी सावली” लवकरच भेटीला | पुढारी

प्रेमाच्या नात्यात गुंफलेली बहिणींची गोष्ट - “काव्यांजली-सखी सावली” लवकरच भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवर २९ मे पासून पर्पल मॉर्निंग मुव्हीज निर्मित “काव्यांजली” – सखी सावली नवी मालिका भेटीला येत आहे. काव्या प्रेभुदेसाईची भूमिका कश्मीरा कुलकर्णी तर अंजली दिवेकरची भूमिका प्राप्ती रेडकर साकारणार आहे.

‘काव्यांजली’ अशाच एकमेकींवर प्रेम करणाऱ्या दोन जिवाभावाच्या बहिणींची गोष्ट आहे. या दोघी चुलत बहिणी असल्या तरीदेखील त्यांचं नातं आई – मुलीसारखं आहे. अंजलीचा जन्म झाल्यापासून ती काव्याची मानसकन्या झाली. काव्याचं लग्न झाल्यावर अंजलीने घराची जबाबदारी उचलली. काव्या सासरी सगळ्या जबाबदाऱ्या अगदी चोख निभावते आहे, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, नवऱ्याच्या प्रेमासाठी, त्याच्याकडून मिळणाऱ्या थोड्या मानासाठी आसुसली आहे. ते आज न उद्या तिला मिळेल, या आशेवर ती जगतेय.

दोन्ही बहिणींची ही अशी समांतर चाललेली नशीबं कुठे येऊन जुळतील का? दोघींनी एकमेकींच्या सुखी संसाराची जी स्वप्नं पहिली होती, ती पूर्ण होतील की धुळीला मिळतील ? त्यांना त्यांच्या नवऱ्याचं प्रेम मिळेल ? नात्यांमधल्या प्रेमाची त्यांची आस पूर्ण होईल हे पाहणे रंजक ठरेल.

Back to top button