ज्ञानवापी प्रकरणी माेठा आदेश : आता सर्व खटल्यांची एकत्रितपणे होणार सुनावणी
पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्ञानवापी मशीद प्रकरणी दाखल सर्व खटल्यांची आता एकत्रितपणे सुनावणी घेण्याचे आदेश वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. ( Gyanvapi mosque cases )
वाराणसी जिल्हा न्यायालयाने स्पष्ट केले की, ज्ञानवापी मशीद प्रकरणी सर्व आठ खटल्यांच.ि एकत्रितपणे सुनावणी करावी.
Gyanvapi mosque matter | Varanasi District Court orders clubbing of all cases, all eight cases to be heard collectively. Now, all the cases related to the Gyanvapi matter will be heard together in the same court. pic.twitter.com/Genx2czByJ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 23, 2023
ज्ञानवापी मशीद परिसरात सर्वेक्षणादरम्यान ज्या ठिकाणी शिवलिंग आढळले होते; त्या ठिकाणी धार्मिक विधी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका याआधी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. कृष्ण जन्मभूमी मुक्ती दलाचे अध्यक्ष राजेश मणी त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली होती. सर्वेक्षणादरम्यान मिळालेले ‘शिवलिंग’ न्यायालयाने आदेश पारित करीत संरक्षित केले आहे. पण शिवलिंग संरक्षित करण्यात आल्यानंतर देखील भाविकांना, शिवभक्तांना येथे पुजा-अर्चना करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असा युक्तीवाद करण्यात आला होता.
१७ मे २०२२ रोजी दिलेला अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत शिवलिंग आढळलेल्या ठिकाणाला संरक्षित करण्याचे तसेच मुस्लीम बांधवांच्या नमाज पठण तसेच इतर धार्मिक अनुष्ठानावर कुठलीही बंदी न घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. मशीद परिसरात देवी-देवतांची पुजा करण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या हिंदू महिलांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित केली होती.
हेही वाचा :