Ropeway In Amarnath : अमरनाथ, वैष्णोदेवी प्रवास होणार सुलभ | पुढारी

Ropeway In Amarnath : अमरनाथ, वैष्णोदेवी प्रवास होणार सुलभ

श्रीनगर; पुढारी वृत्तसेवा : जम्मू-काश्मीर सरकारने नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. पहलगाम आणि सोनमर्गमध्ये रोप वे प्रस्तावित असून, अमरनाथ, वैष्णोदेवीचा प्रवास सुलभ होणार आहे. (Ropeway In Amarnath)

  • १८ नवीन रोप वे जम्मू-काश्मीरमध्ये होणार (Ropeway In Amarnath)
  • ५ रोप वे सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरू
  • ३ रोप वे पुढच्या वर्षी पूर्ण होणार
  • ५ हजार कोटी रुपये अपेक्षित खर्च

अमरनाथ महत्त्वाचा रोप वे… (Ropeway In Amarnath)

  • 9 कि.मी.चा रोप वे बालटाल ते अमरनाथ गुहा
  • 14 कि.मी. सध्याचे एकूण अंतर
  • 10 तासांचा पायी प्रवास अवघ्या 40 मिनिटांचा होणार

पुढच्या वर्षी पूर्ण होणार हे रोप वे

  • 2.4 कि. मी. अंतर वैष्णोदेवी फेज-2
  • 2.1 कि. मी. अंतर शिवखोरी तीर्थक्षेत्र
  • 01 कि. मी. अंतर श्रीनगर येथील शंकराचार्य डोंगर

रोप वेचा असाही फायदा

  • रोप वे जम्मू-काश्मीरसारख्या डोंगरी राज्यात पर्यावरण पूरक माध्यम आहे. झाडांची कत्तल करावी लागत नाही.
  • रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण करावी लागत नाही. रस्ते बांधकाम आणि देखभालीचा खर्चही कमी.
  • वैष्णोदेवी, जम्मू शहर, पटनीटॉप, गुलमर्ग आणि श्रीनगरला रोप वेची सुविधा.

100 कोटींची कमाई गुलमर्गमध्ये
जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेले सर्व रोप वे प्रकल्प नफ्यात आहेत. गुलमर्गमधील प्रसिद्ध गंडोला रोप वेने मागील वर्षी विक्रमी 100 कोटी रुपयांची कमाई केली.

8 लाख पर्यटकांचा गंडोला रोप वेद्वारे प्रवास

वैष्णोदेवीसाठी 250 कोटी खर्च
वैष्णोदेवीसाठी फेज-2 मधील तारकोट मार्ग ते सांझी छट या बहुप्रतीक्षित रोप वेसाठी 250 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

6 तासांचा प्रवास 6 मिनिटांत
वैष्णोदेवीचा रोप वे सुरू झाल्यावर भाविक अवघ्या 6 मिनिटांत मंदिर परिसरात पोहोचतील. आता ताराकोर्टहून सांझीला पायी जाताना 6 तास लागतात.

अधिक वाचा :

Back to top button