पाटणा विमानतळावर  धीरेंद्र शास्त्री यांच्‍या चार्टर्ड विमानाला त्यांच्याच समर्थकांनी घेराव घातला.
पाटणा विमानतळावर धीरेंद्र शास्त्री यांच्‍या चार्टर्ड विमानाला त्यांच्याच समर्थकांनी घेराव घातला.

Baba Bageshwar : पाटणा विमानतळावर धीरेंद्र शास्त्रींच्या विमानाला घेराव; समर्थकांकडून नियमांची पायमल्ली?

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बागेश्वर धामचे  धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) हे सध्‍या बिहार दाैर्‍यावर आहेत. या दाैर्‍यामुळे राजकीय आराेप-प्रत्‍याराेपांचा धुरळा उडला आहे. अशातच आता धीरेंद्र शास्‍त्री यांचा बिहारच्या पाटणा विमानतळावरून एक व्हिडीओ व्हायरल साेशल मीडियावर होत आहे. या व्हिडीओवरुन त्‍यांचा दाैरा पुन्‍हा वादाच्‍या भाेवर्‍यात सापडला आहे. ( Baba Bageshwar )

Baba Bageshwar : समर्थकांची विमानतळाच्‍या धावपट्टीवर धाव…

बिहारच्या पाटणा विमानतळावरील व्हायरल झालेल्‍या व्हिडीओमध्‍ये धीरेंद्र शास्त्री यांच्‍या चार्टर्ड विमानाला त्यांच्याच समर्थकांनी घेराव घातल्याचं दिसत आहे.  त्‍यांच्‍या समर्थकांनी नियमांची पायमल्ली करत थेट धावपट्टीवर जावून विमानाला घेरले दिसत आहे. दरम्यान,(Patna Airport) पाटणा आता विमानतळ प्रशासनाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. विमानाला घेराव घालणारे समर्थक बाहेरचे नाहीत. ते विमानतळावरील कर्मचारी होते, असं स्पष्टीकरण विमानतळ प्रशासनाने दिलं आहे.

व्हायरल व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना विमातळाने प्रशासनाने सांगितले की, व्हिडीओत दिसणारी गर्दी ही बाहेरील भक्तांची नाही. विमानतळावरील सुरक्षाकर्मी आणि ग्राऊँडस्टाफ हेच धावपट्टीवर गेले हाेते. विमानतळावर सुमारे १५० कर्मचारी जमल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

बुधवारी संध्याकाळी धीरेंद्र शास्त्री पाली मिठातील कार्यक्रम संपवुन विमानतळावर आले होते. त्यावेळी त्यांचे समर्थक, भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमल्याचं सांगण्यात येतं आहे. यावेळी बाबा धीरेंद्र शास्त्रींनी आपल्या अनुयायांना शायरी ऐकवल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news