MI vs GT : वानखेडेवर सूर्याचे तांडव | पुढारी

MI vs GT : वानखेडेवर सूर्याचे तांडव

मुंबई; वृत्तसंस्था : सूर्यकुमार यादव…. मिस्टर 360 नावाने नावाने ओळखला जाणारा मुंबईकर पुन्हा एकदा पेटून उठला. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने केलेल्या वादळी शतकी खेळीमुळे मुंबई इंडियन्सने गुजरात विरुद्ध 5 बाद 218 धावा केल्या. सूर्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावा करताना 11 चौकार आणि 6 षटकार ठोकले. सूर्यकुमारचे आयपीएलमधील हे पहिलेच शतक ठरले. गुजरात टायटन्सच्या राशिद खानने 30 धावांत 4 विकेट घेतल्या; पण इतर गोलंदाजांना मुंबईकर फलंदाजांनी धू धू धुतले.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये दमदार सुरुवात केली. गेल्या काही सामन्यांपासून दुहेरी आकडाही न गाठू शकणार्‍या रोहित शर्माने अखेर आपला जुना खेळ दाखवण्यास सुरुवात केली. इशान किशन आणि रोहित शर्माने चौथ्या पाचव्या षटकातच मुंबईला अर्धशतकी मजल मारून दिली. मुंबईने 6 षटकांत बिनबाद 61 धावांपर्यंत मजल मारली.

पॉवर प्लेनंतर मात्र मुंबईची पॉवर संपल्यासारखी परिस्थिती झाली. राशिद खानने रोहित शर्माला 29 धावांवर बाद केले. त्यानंतर इशान किशनची 20 चेंडूतील 31 धावांची खेळी देखील संपवली. यानंतर नेहल वधेराला 15 धावांवर बाद करत मुंबईची अवस्था 3 बाद 88 अशी केली.

पण, यानंतर सुरू झाले सूर्यकुमारचे तांडव. मुंबईचा सूर्या मैदानात आला आणि त्याने वानखेडे हा आपलाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. त्याने एकहाती किल्ला लढवत 49 चेंडूत शतकी तडाखा दिला. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईना 20 षटकांत 5 बाद 218 धावांपर्यंत पोहोचवले. सूर्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. सूर्याचे हे आयपीएलमधील पहिले शतक ठरले. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक 4 विकेटस् घेतल्या.

/p>
हेही वाचा;

Back to top button