Adah Sharma : ‘द केरला स्टोरी’ नंतर अदा शर्माचा आणखी एक धमाका | पुढारी

Adah Sharma : 'द केरला स्टोरी' नंतर अदा शर्माचा आणखी एक धमाका

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘द केरला स्टोरी’ या धमाकेदार चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने ( Adah Sharma ) तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक धमाका घेवून आली आहे. अदा शर्मा लवकरच गिरीश पांड्या याच्या ‘गेम ऑफ गिरगिट’ मध्ये अभिनेता श्रेयस तळपदेसोबत दिसणार आहे. चित्रपटात अदा पोलिस अधिकाऱ्याची दमदार भूमिका साकारणार आहे.

‘गेम ऑफ गिरगिट’ हा चित्रपट अशा तरूणाची कहाणी आहे की, ज्यांना मोबाईल अॅपवर खासगी माहिती दिल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामची कल्पना नसते. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याबाबतची माहिती चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांच्या टविटरवर पोस्ट शेअर करून दिली आहे.

‘गेम ऑफ गिरगिट’ हा चित्रपट प्रसिद्ध ब्लू व्हेल गेमवर आधारित आहे. हा एक इंटरनेट गेम आहे. ज्यामध्ये कथाकथित ५० दिवसांच्या कालावधी दरम्यान प्रशंसकाच्या खेळांडूवर सोपवलेल्या कामांची एक सीरिज असते. यात आव्हानात्मक खेळाडूंना स्वत: ला संपवण्याचे असते. असे दाखवण्यात येणार आहे. ‘द केरला स्टोरी’ या धमाकेदार चित्रपटानंतर अदा शर्माच्या ( Adah Sharma ) अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यानंतर तिच्या ‘गेम ऑफ गिरगिट’ चित्रपटाची निर्मात्यांनी घोषणा केल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुनित झाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button