Taarak Mehta : जेनिफर मिस्त्रीच्या लैंगिक छळ प्रकरणाची लवकरच चौकशी करू : मुंबई पोलिस | पुढारी

Taarak Mehta : जेनिफर मिस्त्रीच्या लैंगिक छळ प्रकरणाची लवकरच चौकशी करू : मुंबई पोलिस

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) या मालिकेतील अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यावर लैगिंक छळाचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार. मुंबई पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत लवकरच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. जेनिफर मिस्त्री बन्सीवालने दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, निर्माता असित मोदी आणि काही क्रू मेंबर्सने तिचा छळ केला. आता या तक्रारीनंतर पोलिस सखोल चौकशी करून लवकरच या प्रकरणाशी संबंधितांचे जबाब नोंदवतील, अशी माहिती मुंबई पोलिसांनी सांगितल्याचे एका वृत्तसंस्थेने सोशल मीडियाच्या माध्यामातून म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेनिफरने निर्माते असित मोदी, प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरुद्ध कामाच्या ठिकाणी लैंगिक गैरवर्तनाची तक्रार दाखल केली होती. जेनिफरने गेल्या दोन महिन्यापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) शोचे शूटिंग केलेले नाही. तिने शेवटचे ७ मार्च रोजी शेवटचे शूटिंग केले होतं.

याबाबत बोलताना जेनिफर म्हणाली की, ‘माझ्या लग्नाचा वाढदिवस आणि होळी असल्याने मला लवकर घरी जायचे होते. यामुळे मी अर्धा दिवस सुट्टी मागितली होती. जाण्याच्या आधी मी निर्मात्यांशी याबाबत बोलले होते. मला माझ्या मुलीसोबत एकत्रित होळी साजरी करायची होती. मात्र, निर्मात्यांनी मला सुट्टी दिली नाही. दरम्यान सोहिल यांनी मला चार वेळा सेटवरून जाण्यास सांगितले आणि कार्यकारी निर्मात्याने माझ्या कारमागे उभे राहून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला आणि मला सेटवरून जाऊ दिले नाही. मी १५ वर्ष या शोचा भाग बनले आहे. सेट सोडून जाताना मला धमकावले गेले. यामुळे मी असित मोदी, सोहील रमाणी आणि जतिन बजाज यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.’

‘ही घटना ७ मार्च रोजी घडली असून सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. ७ मार्चनंतर मला वाटलं की, निर्माते फोन वरून संपर्क साधतील. परंतु, २४ मार्च रोजी सोहिलने मला थेट नोटीस पाठवत मी शोमधून बाहेर पडल्याचे सांगितले. शिवाय माझे मानधन देणार नसल्याचे सागितले. यानंतर अथक प्रयत्न करून माझे मानधन काढून घेतले. तसेच त्यांना नोटीस पाठवून गैरवर्तणूक केल्याबद्दल माफी मागावी, असे सांगितले. अजूनही त्यांनी या नोटीसचे उत्तर दिलेले नाही. याप्रकरणाचा पोलिस पुढील तपास करतील,’ असेही तिने म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button