साखर उतार्‍यात बेळगाव जिल्हा अव्वल | पुढारी

साखर उतार्‍यात बेळगाव जिल्हा अव्वल

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटकातील 69 साखर कारखान्यात 2022- 23 गळीत हंगामात 549.50 लाख टन उसाचे गाळप झाले असून सरासरी साखर उतार्‍यात कर्नाटकने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. राज्याचा साखर उतारा 10.10 टक्के आहे. बेळगाव जिल्ह्यातील 26 साखर कारखान्यातून राज्यात सर्वाधिक गाळप झाले आहे.

गत हंगामात देशातील गळीत हंगामाची सुरुवात कर्नाटकातून झाली होती. कर्नाटकात अतिरिक्त ऊस असल्याने 1 ऑक्टोबरपासून गळीत हंगामाला प्रारंभ झाला होता. कर्नाटकात 69 साखर कारखान्यातून 55.50 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. देशात 30 एप्रिलअखेर 320.30 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून हंगाम अखेरपर्यंत 327.35 लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 105.30 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. 531 कारखान्यांपैकी 67 साखर कारखान्यात अजूनही ऊस गाळप सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिली आहे.

Back to top button