कोल्हापूर : कायदा सुव्यवस्थेसाठी कुरुंदवाड शहरासह ग्रामीण भागातून पोलिसांचा रूट मार्च | पुढारी

कोल्हापूर : कायदा सुव्यवस्थेसाठी कुरुंदवाड शहरासह ग्रामीण भागातून पोलिसांचा रूट मार्च

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा – कुरुंदवाड पोलीस पाण्याच्या कार्यक्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागात उरूस, जत्रा, यात्रा आणि धार्मिक सणांच्या कालावधीत कोणताही अनुचित घटना घडू नये. शांतता, सुव्यवस्था कायम रहावी, या उद्देशाने येथील पोलिस ठाण्याच्या रॅपिड ॲक्शन फोर्सतर्फे नागरिकांकडून गावातील स्थिती जाणून घेत शहरातील संवेदनशील भागात रूट मार्च काढण्यात आला.

कुरुंदवाड पोलीस ठाणे व कोल्हापूर जिल्हा राखीव पोलीस दल आणि गृह रक्षक दलाच्या जवानांचा शस्त्र रुटमार्च काढण्यात आला. त्याचे नेतृत्व पोलीस निरीक्षक बालाजी भांगे उपनिरीक्षक अमित पाटील विजय घाटगे यांनी केले.

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शहरी व ग्रामीण भागातील उरूस जत्रा यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येक गावामध्ये शांतता कमिटीच्या बैठका घेऊन अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी नागरिक व ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला वेळोवेळी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करत त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांवर पथसंचालन करून दर्गा चौक मित्र चौक माळ भाग बागवान गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगरपालिका चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत रुटमार्चने मार्गाक्रमण केले.

रूट मार्चमध्ये पोलीस कॉन्स्टेबल अरुण वटारे, अमित प्रधान, अनिल चव्हाण, शहाजी फोंडे, राजेंद्र पवार, अरुण नागरगोजे, शकील कुलकर्णी, चंद्रकांत मोरे मोहसीन कुलकर्णीसह पोलिस दलाच्या ४५ कर्मचाऱ्यांसह शीघ्र कृती दलाचे ३८ जवान व गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.

 

Back to top button