Cognizant lay off | बँकिंग क्षेत्रातील संकटाचा IT उद्योगाला फटका, Cognizant मधून ३,५०० कर्मचाऱ्यांना नारळ | पुढारी

Cognizant lay off | बँकिंग क्षेत्रातील संकटाचा IT उद्योगाला फटका, Cognizant मधून ३,५०० कर्मचाऱ्यांना नारळ

पुढारी ऑनलाईन : माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी कॉग्निझंटने (Cognizant lay off) ३,५०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कॉग्निझंटचा सर्वाधिक महसूल अमेरिकेतून येतो. पण २०२३ मध्ये कंपनीच्या महसुलात घट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कॉग्निझंटने मोठ्या प्रमाणात नोकरकपातीची घोषणा केली आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

कंपनीचे नवनियुक्त सीईओ रवी कुमार एस (CEO Ravi Kumar S) यांच्यापुढे Accenture, टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या आयटी उद्योगातील दिग्गज कंपन्यांसोबत स्पर्धेत राहण्याचे मोठे आव्हान आहे. ही कंपनी अमेरिकेत सूचीबद्ध असली तरी त्यांचे बहुतांश काम भारतातून चालते.

कॉग्निझंटचे मार्जिन सध्या १४.६ टक्के आहे, जे टेक महिंद्राच्या (Tech Mahindra) तुलनेत आहे आणि आयटी उद्योगातील (IT industry) सर्वात कमी आहे. संपूर्ण वर्षासाठी कंपनीने ऑपरेटिंग मार्जिन १४.२-१४.७ टक्क्यांच्या श्रेणीत राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कॉग्निझंटने वार्षिक निव्वळ नफ्यात ३ टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीचा महसूल ०.३ टक्के घट होऊन ४.८१ अब्ज डॉलरवर आला आहे. (Cognizant lay off)

बँकिंग क्षेत्रातील संकटामुळे सर्व प्रमुख IT कंपन्यांच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. त्याचा फटका कॉग्निझंटलाही बसला आहे. कॉग्निझंटमध्ये एकूण ३,५१,५०० कर्मचारी काम करतात. याआधी Accenture कंपनीने १९ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती.

हे ही वाचा :

Back to top button