पिंपरी शहरातील भाजी मंडईत मिरची, गाजर, भेंडीची आवक | पुढारी

पिंपरी शहरातील भाजी मंडईत मिरची, गाजर, भेंडीची आवक

पिंपरी(पुणे); शहरातील भाजी मंडईत भेंडी, तसेच नाशिकचे गाजर व सोलापूरच्या हिरव्या मिरचीची आवक रविवारी वाढली होती. तसेच, तेलंगणा राज्यातील आवळादेखील बाजारात आला होता. अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांचे दर गेल्या आठवड्यात वाढले होते. मात्र, या रविवारी दर कमी झाल्याने भाज्यांचे भाव सामान्यांच्या आवाक्यात होते.

तसेच, हैद्राबाद या भागामधून हिरवी मिरची येत असल्याने दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, आता राज्यातील सोलापूर येथील हिरव्या मिरचीची आवक वाढल्याने दरातही घट झाली आहे. शहराच्या आजुबाजूला अवकाळी पाऊस सुरू आहे. बर्याच ठिकाणी गारपीटीचा पाऊसदेखील होत आहे. परिणामी भाज्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ असल्याचे दिसून आले.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी उपबाजार, पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई व आकुर्डी येथील किरकोळ बाजारात कोथिंबीर 20 ते 25, पालक 20, मेथी 20, कांदापात 15, शेपू 15 तर पुदीना 15 रूपये दराने प्रतिपेंडीची विक्री झाली. तसेच, आल्याचे दर 110 रूपये प्रतिकिलो होते. तर, कांदा 15 रूपये व टोमॅटो 25 रूपये प्रतिकिलो दराने विक्री झाली

मोशी उपबाजारात कांद्याची आवक 1132 क्विंटल, बटाटा 275 क्विंटल, टोमॅटो 552 क्विंटल, मटार 6 क्विंटल, भेंडी 75 क्विंटल, आले 16 क्विंटल एवढी आवक झाली आहे. तसेच, घाऊक बाजारात मिरची प्रतिकिलो 25 रुपये, कांदा 8 ते 9, बटाटा 8, लसूण 35, आले 50, टोमॅटो 10, भेंडी 27, मटार 50 रूपये दराने विक्री झाली. मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 42200, फळे 439 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 3296 क्विंटल एवढी आवक झाली.

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या दर (प्रति पेंडी)
मेथी 20
कोथिंबीर 20 ते 25
कांदापात 15
शेपू 15
पुदिना 15
मुळा 15
चुका 15
पालक 20
फळभाज्यांचे किलोचे भाव
कांदा 15
आले 100
भेंडी 60
टामॅटो 25
सुरती गवार 100
गावरान गवार 120
दोडका 40
दुधी भोपळा 50
लाल भोपळा 50 ते 60
कारली 40
वांगी 30 ते 40
भरीताची वांगी 50
तोंडली 50
पडवळ 40
फ्लॉवर 50
कोबी 30
बिन्स 70-80
बीट 50
आवळा 60
राजमा 50
काकडी 40
शिमला 60
शेवगा 90

Back to top button