सांगली बाजार समिती निवडणूक: व्यापारी, हमाल गटात चुरशीने मतदान | पुढारी

सांगली बाजार समिती निवडणूक: व्यापारी, हमाल गटात चुरशीने मतदान

सांगली; पुढारी वृत्तसेवा: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (दि.२८) मतदान होत आहे. दुपारी बारापर्यंत हमाल गटातून 56 तर व्यापारी गटातून 41 टक्के मतदान झाले होते. सेवा सोसायटी गटातून 39 तर ग्रामपंचायत गटातून 34 टक्के मतदान झाले होते.

दिग्गज नेते प्रचारासाठी उतरल्याने चुरशीची ठरलेल्या सांगली, इस्लामपूर बाजार समितीसाठी सकाळी साडेसातपासून मतदान सुरू झाले. पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह एक खासदार, चार आमदार, तीन माजी आमदार यांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. सांगली समितीसाठी २४ तर, इस्लामपूरसाठी १८ मतदान केंद्रे असून दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित पॅनेलमध्ये चुरशीची लढत होत आहे.

हेही वाचा 

Back to top button