कोल्हापूर : 14 जणांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह | पुढारी

कोल्हापूर : 14 जणांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 14 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना बुधवारी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह घोषित झाले. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी सन्मानचिन्ह प्राप्त राज्यातील 800 अधिकारी, कर्मचार्‍यांची यादी जाहीर केली.

पोलिस दलात विविध प्रवर्गांत केलेल्या उत्तम कामगिरी, उल्लेखनीय, प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिसपदक, पोलिसपदक, शौर्यपदकप्राप्त पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील 14 जणांचा हे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक तुषार पाटील, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक इकबाल गुलाब महात, जयसिंगपूरचे सहायक पोलिस उपनिरीक्षक (चालक) जयगोंडा आनंदा हजारे, मोटार वाहन विभागाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक (चालक) राजेंद्र धोंडिराम पाटील व शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक (चालक) दिवाकर सदाशिव होवाळे, शाहूवाडीचे पोलिस हवालदार (चालक) गोरक्ष आनंदा माळी, जुना राजवाड्याचे नामदेव बळवंत पाटील, पोलिस मुख्यालयाचे सीताराम बाळू डामसे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे संतोष नारायण पाटील, नागरी हक्क संरक्षण विभागाचे दयानंद दशरथ कडुकर, जितेंद्र अण्णासाहेब शिंदे, वैशाली पुरुषोत्तम पिसे, लक्ष्मीपुरीचे पोलिस नाईक रणजित अशोक देसाई व पोलिस मुख्यालयाचे संदीप भगवान काशीद यांना महासंचालक सन्मानचिन्ह देऊन दि. 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी गौरविण्यात येणार आहे.

Back to top button