छत्रपती संभाजीनगर : हळदीच्या कार्यक्रमात डीजेवरून दोन गटात हाणामारी | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : हळदीच्या कार्यक्रमात डीजेवरून दोन गटात हाणामारी

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मिसारवाडी येथे लग्नाच्या हळदी कार्यक्रमात डीजेच्या गाण्यावर नाचण्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यावेळी झालेल्या दगडफेकीत तीघेजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमींसह तब्बल दिडशे ते दोनशे जणांचा जमाव सिडको पोलिस ठाण्यात जमल्याने काही काळ तणावाचे वातावण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मिसारवाडीतील गल्ली नंबर. ५ येथे विवाहाच्या निमित्ताने बुधवारी हळदीचा कार्यक्रम सुरु होता. डीजे लावून नाच-गाणे सुरू होते. त्यावेळी याच भागातील एका गटाच्या तरुणांनीही तिथे येऊन गाण्यांच्या चालीवर ठेका धरला. त्यास विवाह समारंभासाठी आलेल्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला. त्यावरून वाद वाढत गेला. बाहेरून आलेल्या तरुणांनी नाचण्यास विरोध केल्याच्या रागातून लग्न मंडपात दगडफेक सुरू केली. त्यामुळे तीन तरुणांचे डोक्‍याला मार लागला. ते गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर प्रचंड गोंधळ उडाला. या घटनेमूळे भीतीचे वातावरण तयार झाले.

घटनेनंतर जवळपास दिडशे ते दोनशे जण सिडको पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी जखमींनी घाटी रुग्णालयात दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने मिसारवाडीत आणि सिडको पोलिस ठाण्यासमोर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान दोन्ही गटातील लोक मद्य प्राशन केलेले होते, नाचण्यावरुन वाद झाल्याने त्यांच्यात हाणामारी झाले अशी माहिती पोलिसांनी दिली.

-हेही वाचा 

पर्यावरणप्रेमी-प्रशासनात हवा समन्वय ; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मत

Sweden’s research rocket : स्वीडनचे संशोधन रॉकेट कोसळले नॉर्वेच्या हद्दीत

 

Back to top button