Amravati : आमदार रवी राणांच्या विरोधात भाजपच मैदानात उतरले; विकास फलकालाच फासले काळे  | पुढारी

Amravati : आमदार रवी राणांच्या विरोधात भाजपच मैदानात उतरले; विकास फलकालाच फासले काळे 

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजपच आता मैदानात उतरली आहे. भाजपचे गटनेते तुषार भारतीय यांनी मंगळवारी (२५ एप्रिल) साई नगरात लावलेल्या विकास कामाच्या फलकाला काळ फासले. आगामी दिवसात अमरावती शहराचे राजकीय वातावरण तापणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. प्रभागातील नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचं आमदार रवी राणा श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपचे तुषार भारतीय यांनी केला आहे. (Amravati )
तुषार भारतीय यांनी मंगळवारी सकाळी प्रभाग क्र. 19 साईनगर येथील सातुर्णा चौक ते अकोली रेल्वे स्टेशन पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर लावलेल्या फलकाला आपल्या कार्यकर्त्यासह जावून काळ फासलं. नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचे आमदार रवी राणा श्रेय घेत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. जो निधी आम्ही मंजूर केला महापालिकेचा किंवा वेगवेगळ्या निधीतून जो आम्हाला निधी मिळाला त्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावले. त्यांना दहा दिवसापूर्वीच अल्टीमेटम दिले होते. ते बोर्ड काढून टाका. तुमचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. पण त्यांनी काढले नाही. त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमाने आम्ही प्रत्यक्ष निरोप पाठवला की ते बोर्ड काढून टाका त्यांनी काढले नाही.
Amravati : आम्ही काम करायचं आणि दुसऱ्यांनी श्रेय घ्यायचं
 तुषार भारतीय म्हणाले, आम्ही काम करायचं आणि फक्त दुसऱ्यांनी श्रेय घ्यायचं; हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही. म्हणून आज (दि.२५) आम्ही त्यांच्या बोर्डाला काळ फासल आहे. बडनेरा मतदारसंघात ज्या-ज्या ठिकाणी असं कृत्य केलं असेल त्या त्या ठिकाणी नागरिक, भाजपचे कार्यकर्ते आणि इतर कुठलेही नगरसेवक  कदापी सहन करणार नाही.
हेही वाचा 

Back to top button