हसन मुश्रीफ यांच्या मुलांना 4 मेपर्यंत अंतरिम दिलासा | पुढारी

हसन मुश्रीफ यांच्या मुलांना 4 मेपर्यंत अंतरिम दिलासा

मुंबई : कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांना विशेष पीएमएलए न्यायालयाने 4 मेपर्यंत ईडीच्या कारवाईपासून दिलेले संरक्षण कायम ठेवले.

पुढील सुनावणीपर्यंत ईडीने मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांवर अटक व अन्य कारवाई करू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मुश्रीफ यांचे कथित सी.ए. महेश गुरवच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णयाची सुनावणीही 4 मेपर्यंत पुढे ढकलली.

Back to top button