मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबादचा दौरा म्हणजे मार्केटिंग : नाना पटोले | पुढारी

मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबादचा दौरा म्हणजे मार्केटिंग : नाना पटोले

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे उस्मानाबाद ,तुळजापूर दौऱ्यावर येऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. तसेच तुळजाभवानीचे दर्शन घेतले दरम्यान सोलापुरातल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करण्याऐवजी ते तात्काळ मुंबईला नेऊन गेले. हे सरकार शेतकरी विरोधी असून मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा म्हणजे मार्केटिंग आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे कष्ट त्यांनी घेतले नाहीत, अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तसेच फळबागांचे देखील नुकसान झाले आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button