Nandini vs Amul : कर्नाटकात ‘अमूल’ विरोधात कन्नड संघटनांचे आंदोलन | पुढारी

Nandini vs Amul : कर्नाटकात 'अमूल' विरोधात कन्नड संघटनांचे आंदोलन

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकात अमूल दूध आणि दहीविक्रीविरोधात शेतकरी संघटना, कन्नड संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही कारणास्तव अमूलच्या दूध-दही विक्रीला मुभा देऊ नये, अशी मागणी या संघटनांनी लावून धरली आहे. म्हैसूर बँकेसमोर सोमवारी सकाळी कन्नड संघटनांनी आंदोलन सुरू केले. (Nandini vs Amul)

संघटनेचे नेते अंजनेय म्हणाले, अमूल संस्था कर्नाटकातल्या लोकांच्या भावनेशी खेळ खेळत आहे. कर्नाटकातल्या जनतेने केएमएफ दूध संस्थेची उभारणी केली आहे. तिला उतरती कळा लागू नये. केंद्र सरकारने नंदिनीचे विलीनीकरण अमूलमध्ये करण्याचा प्रस्ताव आखला आहे. तो चुकीचा आहे. त्याविरुद्ध तीव्र आंदोलन करू.अध्यक्ष भैय्या रेड्डी म्हणाले, कर्नाटकात शेतकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, त्यामुळे दूध डेअरी क्षेत्राचे खासगीकरण केल्यास ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, नायजेरिया त्याचबरोबर युरोपियन देशात दुधापासून पाठवलेल्या पदार्थांवर अमूलचेच नाव ‘अमूल’ विरोधात कन्नड संघटनांचे आंदोलन येणार. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अमूलला संधी देऊ नये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केएमएफ संस्था बंद करण्याचा डाव आखला आहे, असा आरोप निधर्मी जनता दलाचे नेते माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. २००८ पासून राज्यात अमूलला संधी देऊन एमएफ संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे कुमारस्वामी म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत राज्यात अमूल दूध व दही विक्रीला मुभा दिली जाणार नाही. केएमएफचे रक्षण करू.

– एच. डी. रेवण्णा, अध्यक्ष, कर्नाटक दूध महासंघ.

हेही वाचा 

Back to top button